आमच्याविषयी

ज्ञानगंगा सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई हि संस्था गुढीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर दि.०९ एप्रिल २००५ रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणी क्र. बी. ओ. एम. /आर. एस. आर. /के. वेस्ट / (सी.आर)/८३५/१९८७-८८ या नोंदणी क्रमांकाने नोंदणीकृत आहे. समाजातील लोकांना बचतीची सवय लागणे, त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी आर्थिक मदत करून त्यांची पतनिर्मिती साधन्याच्या उद्देशाने श्री योगेश श्रीरंग वरे यांनी सभासद संख्या ५०० व भागभांडवल रू. २३५००/- यावर संस्था कार्यान्वित केली.

१९ वर्षापुर्वी भायखळा व ग्रॅन्ट रोड भाजी मार्केट मधील भाजीपाला व्यापारी यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या या संस्थेचा प्रवास आज महाराष्ट्रातील बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पुणे, सातारा या ६ जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्राचा आहे. सद्दस्थितीत संस्थेच्या प्रशासकीय कार्यालय व ४ शाखा कार्यरत आहेत. यामध्ये २० कर्मचारी व ३२ दैनंदिन ठेव प्रतिनिधी आहेत. संस्थेच्या सर्व शाखा संगणीकृत असुन सभासदांकरीता कोअर बँकिंग प्रणालीद्वारे सेवा पुरविली जाते.

संचालक मंडळ

अधिकारी वर्ग